Tree Information - SAGI
Eng | Mar | Hin

आंबा

Scientific Name - Mangifera indica

‎आंबा हा विषुवृत्तीय प्रदेशात आढळणारे झाड आणि फळ आहे. या फळाला महाराष्ट्रात 'कोकणचा राजा' म्हणतात. तर इतर भाषांत अरबी मंगा, आसामी आम আম, बंगाली आमा, আম कन्नडा मावू ಮಾವು , काश्मिरी अम्ब्, कोंकणी आंबॉ, मल्याळम मावू മാവു് मणिपुरी अंबा, संस्कृत आम्र, चूत, सिंहल अंबा, तमिळ मांगाई மாங்காய், तेलुगु आम्रामू ఆమ్రము असे म्हणतात. एप्रिल-जून हा या फळाचा मोसम असतो. आंब्याचा उगम नक्की कुठे झाला हे अज्ञात आहे. परंतु दक्षिण आणि दक्षिणपूर्व आशियामधे मोठ्या प्रमाणातील जैववैविध्य पाहता आणि तेथील २५० ते ३०० लक्ष वर्षांचा जीवाश्मांचा इतिहास पाहता आंब्याचा उगम ह्याच भागात झाला असावा असे मानण्यात येते. वेग वेगळ्या भागात राज्यात वेगवेगळ्या प्रकारचे आंबे पिकतात. गोव्यात मानकुराद आंबा पिकतो.


Tree Location

© 2024 Sagi